Now Loading

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपा चा आसूड मोर्चा आमदार डॉ कुटे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर दि26 ऑक्टोबर ला धडकणार शेतकरी

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपा चा आसूड मोर्चा आमदार डॉ कुटे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर धडकणार शेतकरी दिनांक 26/10/2021 रोजी भारतीय जनता पार्टी च्या वतीने मतदारसंघाचे आमदार,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या खंबीर नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या घेऊन उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे भव्य अश्या आसूड मोर्चा चे आयोजन केले आहे. सदर मोर्चा ला ठीक दुपारी 1 वाजता राठी जिनिंग येथून सुरवात होणार असून मोर्चा ला मतदारसंघातील शेतकरी बांधव, भारतीय जनता पार्टीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून मोर्चा शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करीत निवेदन देण्यासाठी उपविभागीय कार्यालय येथे येणार आहे. मागील दोन वर्षात शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट सातत्याने येत असून त्यात सरकारी सुलतानी कारभाराने अधिकची भर पडत आहे. पीकविमा, अतिवृष्टी, दुष्काळ आणि कर्जमाफी आदी संकट शेतकऱ्यावर येऊनही सरकार त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतीच पाऊले उचलता ना दिसत नाही यामुळे शेतकरी बांधवान मध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. सरकार विरोधातील हा रोष रस्त्यावर यावा म्हणून भाजपा ने या मोर्चा चे आयोजन केले आहे. हा आसूड मोर्चा राठी जिंनिग येथून सुरू होऊन उपविभागीय कार्यलयावर धडकणार आहे तरी या मोर्चाला शेतकरी बांधव आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा पदाधिकारी यांनी केले आहे