Now Loading

* जळगाव सुनगाव रोड वरील भीषण अपघातातील रामकृष्ण बोडखे यांचा अखेर दुर्दैवी मृत्यू...

*त्या भीषण अपघातातील रामकृष्ण बोडखे यांचा अखेर दुर्दैवी मृत्यू... जळगाव जामोद येथील आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पाणी प्लांट जवळ दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी एका भरधाव ट्रॅक्टरने जळगाव वरून येणाऱ्या रामकृष्ण बोडखे व त्यांची पत्नी नात जामोद करिता जात असताना सुनगावावरून येणाऱ्या भरधाव वेगात येत असणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. त्या धडकेमध्ये रामकृष्ण बोडखे व त्यांची पत्नी गंभीररीत्या जखमी झाले होते. जामोद येथीलच सामाजिक कार्यकर्ते रमेश बानाईत यांनी व काही नागरिकांनी आमदार कुटे यांच्या पाणी प्लांट जवळ रोडच्या कडेला त्यांना पडलेले बघून रमेश बानाईत यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला फोन लावून या घटने बद्दल माहिती दिली तसेच त्यांनी 108 या क्रमांकावर फोन लावून ॲम्बुलन्स ला पाचारण केले होते. त्यांना घटनास्थळावरून तात्काळ जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अकोला येथे रेफर करण्यात आले होते. त्यांच्यावर अकोला येथील आयकॉन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना. तिथेच त्यांची दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास प्राणज्योत मावळली. तसेच रामकृष्ण बोडके यांच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेला जबाबदार असणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई कधी होते तसेच असे बेजबाबदार पणे भरधाव वेदात लोकांना चिरडत जाणे हे कितपत योग्य. असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. रामकृष्ण बोडखे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ट्रॅक्टर चा शोध लावून त्या ट्रॅक्टर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहेत.