Now Loading

श्री. राजेश गवळी, संयुक्त आयकर आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल श्री. राधेश्याम चांडक यांच्या हस्ते सत्कार संपन्न

बुलडाणा : श्री. राजेश गवळी यांनी नांद्राकोळी ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण घेऊन पुढील विद्यालयीन शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले असून बुलडाणा शहरातील क्रांती नगर मधील संत काशिनाथ बाबा वसतीगृह व समाज कल्याण वसतीगृहामध्ये राहून शिक्षण पूर्ण केले आहे. वर्ग १० वी नंतर D.Ed. केल्यावर प्राथमिक शिक्षक ही सेवा देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (M.P.S.C.) मार्फत पहिली निवड लेखाधिकारी (वित्तसेवा) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी अकोला, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये शासकीय कामाची सेवा दिली व त्यानंतर त्यांनी जिल्हा उपनिबंधक (D.D.R.) म्हणून सुध्दा काम केले. शासकीय सेवेत ही सर्व कामे करीत असतांना त्यांनी U.P.S.C. ची तयारी करून ते I.R.S. झाले. U.P.S.C. मार्फत रजिट्रार ऑफ कंपनी कॉर्पोरेट, मंत्रालय, नवि दिल्ली (I.C.L.S.) येथे डायरेक्टर म्हणून काम पाहिले. यानंतर त्यांची पहिली पोस्टींग नागपूर येथे सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून झाली. त्यांच्या कामाची व्याप्ती पाहता आज रोजी त्यांची पुणे येथे पदोन्नती होऊन “संयुक्त आयकर आयुक्त (वित्त मंत्रालय, भारत सरकार)" म्हणून निवड झाली आहे. आज आपल्या नांद्राकोळी छोट्याशा गांवातील एक मध्यमवर्गीय विद्यार्थी संयुक्त आयकर आयुक्त पदावर निवड झाल्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राधेश्याम चांडक व C.M.D. डॉ. सुकेशजी झंवर, सौ. कोमलताई झंवर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.