Now Loading

ईडी"चा छापा उद्या माझ्या घरावर ही पडेल ; का म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे अशा?

भारतात "ईडी" हा शब्द आता सर्व परिचित झाला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी, बेनामी मालमत्तेची चौकशी आता थेट ईडी मार्फत होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एका स्थानिक कार्यक्रमात एमआयएम वंचित बहुजन आघाडी या पक्षांवर टीका करताना हे पक्ष कोणत्याही कामाचे नाहीत, ते भाजप साठी काम करतात, पेटवतात व भांडणे लावतात. आज देशात भीतीचे वातावरण आहे, कोण कधी घरात घुसून चौकशी करतील, अटक करतील सांगता येत नाही, उद्या माझ्या घरावर ही ईडीचा छापा पडेल, ईडी म्हणजे आज पान-तंबाखू चे दुकान झाले आहे, ही भीती तयार करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाने केले आहे अशा शब्दात त्यांनी तोफ डागली.