Now Loading

सोलापूर : भाजपचे समाधान आवळे, राजू आलूरे व गिरीश सुरवसे यांच्यावर गुन्हा दाखल

सोलापूर : महापालिकेची परवानगी न घेता विकास कामाच्या उद्घाटनाचे बेकायदेशीर डिजिटल लावल्या प्रकरणी भाजपच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश देविदास जोशी कनिष्ठ लिपिक,महानगरपालिका यांनी फिर्याद दिली आहे. 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापूर पुणे हायवे वरील जोशी गल्ली रोडवरील मधुकर शिवाजी गायकवाड यांच्या घराशेजारी केगाव येथे विजयकुमार देशमुख यांचे वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतुन कॉक्रीट रस्त्याचे उद्घाटन असे लिहीलेले व समाधान आवळे राहणार जय मल्हार चौक,, राजू आलूरे व गिरीश सुरवसे दोघे राहणार बाळे या भाजपा पक्षाचे पदाधिकारी यांचे चित्र असलेले १० बाय १५ चे डिजीटल बोर्ड सार्वजनिक रोडवर अडथळा होईल असे विनापरवाना लावुन शहराचे सौदर्यास बाधा होईल असे कृत्य केले आहे तसेच बोर्ड काढुन घेण्याच्या सुचना देवुनही काढले नाही व बोर्ड वर मुद्रक प्रोपरायटर याबाबत कोणतीही छपाई न करता सदरचे बोर्ड प्रिंट करुन सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द केले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस नाईक कसबे हे करीत आहेत.