Now Loading

सोलापूरात नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर

सोलापूर : पंढरपूर ते आळंदी हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंढरपुरात सकाळी ११ वाजता होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संतमंडळींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आ.प्रशांत परिवारक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती आहे, असेही ते म्हणाले. दरवर्षी लाखो भाविक आळंदी या राष्ट्रीय पालखी महामानाचते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर वा पायी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गाांचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. कोरोनामुळे भूमिपूजन कार्यक्रम पेता आला नाही. त्यानंतर आता येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दहा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे. बरोबर धर्मपुरी ते जेजुरी लोणंद, लोणंद ते दिवे घाट, दिवे घाट ते हडपसर असा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गामध्ये पाटस ते तोंडले बोंडले १३० किलोमीटरचा रस्ता इंदापूर ते तोंडले- बॉडले ४६ किलोमीटरचा रस्ता पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर या रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती आ. प्रशांत परिचारक यांनी कार्यक्रमासाठी पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचा ९६५ तर पंढरपूर ते आळंदी या संत तुकाराम महाराज पालखी मार्ग ९६५ जी असा क्रमांक आहे. सध्या वाखरी ते मोहोळ ४४ किलोमीटर, वाखरी ते खडूस ३० किलोमीटर खुसी धर्मपुरी ४० किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आ. प्रशांत परिचारक यांनी दिली.