Now Loading

प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या 'राधे श्याम' चित्रपटाचा टीझर रिलीज, बाहुबली अभिनेता दिसणार वेगळ्या अंदाजात

टॉलीवूड अभिनेता प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या 'राधे श्याम' चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभास बऱ्याच दिवसांनी रोमँटिक स्टाईलमध्ये दिसणार आहे. राधे श्यामचा टीझर आज रिलीज झाला. या टीझरमध्ये प्रभासची स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. प्रभासने आज त्याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. प्रभास आणि पूजाचा हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राधे श्याम हा बहुभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत आहे. ज्याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे.