Now Loading

जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन राज्य महानंद डेअरीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचे आवाहन

संगमनेर तालुक्यात लाळ खुरकूत व लंपि स्किन डेसिज या आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसू लागला असून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना आजाराची लक्षणे दिसतात पशुवैद्यकीय अधिकारी व राजहंस दुध संघाचे स्वयंरोजगार केंद्र अधिकारी यांना संपर्क करून उपचार करून घ्यावेत. लहान-मोठ्या सर्व जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन राज्य महानंद डेअरी तसेच संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले. संगमनेर येथे राजहंस दूध संघ व पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाळ खरकुत व लंपी स्किन डेसिज आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते.  यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, संपतराव डोंगरे, पशुधन विकास अधिकारी डॉ प्रशांत पोखरकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, डॉ. संतोष वाकचौरे, डॉ. अजय थोरात, डॉ. जालिंदर तिटमे, डॉ. संजय थोरात, डॉ. भोर, डॉ. जोधळे, डॉ. वर्षा शिंदे, डॉ. गबाले, डॉ. पानसरे, डॉ. प्रमोद पावसे. दुध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, व राजहंस दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित खिल्लारी व तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षक तसेच दूध संघाचे स्वयंरोजगार केंद्र अधिकारी उपस्थित होते.