Now Loading

नान्नजदुमाला येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान परिसरात वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण खड्ड्यांमध्ये रक्षा विसर्जित करून आंबा रोपांची लागवड ; वृक्षसंवर्धनाचा केला निर्धार

संगमनेर : तालुक्यातील नान्नजदुमाला येथील गायकवाड कुटुंबियांनी वडिलांच्या स्मरणार्थ श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान परिसरात वृक्षारोपण केले. रूढीपरंपरेला मूठमाती देत मंदिर परिसरात खड्डे खोडून त्यात रक्षा विसर्जित करीत आंबा रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपनातून सामाजिक संदेश देत गायकवाड कुटुंबियांनी वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला. नान्नजदुमाला येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथ अंबुजी गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांनी श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान परिसरात खड्डे खोदून त्यात रक्षा विसर्जन करण्यात आले. सदर खड्ड्यांमध्ये आंब्याच्या ११ वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. याकामी अशोक गायकवाड, गोर्डे मळा ( पारेगाव गडाख ) प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव गायकवाड, यशवंत गायकवाड सहित परिवारातील सदस्य उपस्थित होते. वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्याचे मुखाय्ध्यापक साहेबराव गायकवाड यांनी सांगितले. यानिमित्ताने गायकवाड कुटुंबियांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.