Now Loading

धक्कादायक.. एटीएम कार्ड बदलून ३१ हजाराला गंडा !

संगमनेर शहरात एटीएम कार्ड बदलून ३१ हजाराला गंडा घालण्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एटीएम कार्ड चालू करून देतो असे म्हणत एका ४५ वर्षीय व्यक्तीला ३१ हजाराला गंडा घालण्यात आला. शुक्रवारी ( दि. २२ ) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भास्कर मारुती घुले ( रा. कौठे धांदरफळ ता. संगमनेर ) हे नवीन एटीएम चालू करण्यासाठी कार्पोरेशन बॅंके  जवळील एटीएम सेंटर येथे गेले होते. त्याच दरम्यान अनोळखी इसमाने मी तुमचं एटीएम चालू करून देतो, असे म्हणत घुले यांच्या जवळून एटीएम कार्ड घेतले व पिन नंबर घेतला. त्यानंतर घुले यांना दुसरे एटीएम कार्ड दिले व निघून गेला. त्यानंतर सदर इसमाने सिन्नर येथे जाऊन घुले यांच्या एटीएम कार्डने ३१ हजार रुपये काढले. सदर प्रकार लक्षात आल्यावर भास्कर मारुती घुले यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शिवाजी फ