Now Loading

तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब भोसले यांची बिनविरोध निवड

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे आज सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत नानासाहेब भोसले यांची तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष समाधान भोसले यांचा दोन वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने सर्वानुमते नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली ग्राम सभेच्या अध्यक्षा तथा सरपंच अर्चना अजित खबाले यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तंटे गाव पातळीवरच मिटवता यावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे गठन गाव पातळीवर करण्यात येते. या वेळी सभेचे सचिव म्हणून ग्रामसेवक निलेश यादव यांनी काम पाहिले.