Now Loading

तळेगाव दिघे सोसायटीच्या सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप सुरू

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटप सुरु करण्यात आल्याची माहिती, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे यांनी दिली. तळेगाव सोसायटीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर यांच्या हस्ते सभासदांना १० टक्के लाभांश वाटप सुरु करण्यात आले. प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर दिघे, संचालक विठ्ठलराव दिघे, मच्छिंद्र दिघे, सोपानराव दिघे, विकास गुरव, चांगदेव दिघे, संपतराव दिघे, बी. सी. दिघे, सचिव अनिल दिघे, सूर्यभान दिघे, सुभाष दिघे सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ सभासद दगडू पाटील दिघे यांचा सत्कार करीत सोसायटीच्या लाभांश वाटपास प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविक सचिव अनिल दिघे यांनी केले. सूर्यभान दिघे यांनी आभार मानले.