Now Loading

पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.64 टक्के

पुणे : पुणे विभागातील 19 लाख 62 हजार 41 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख 9 हजार 514 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 874 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 599 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.64 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.