Now Loading

दिल्लीत डेंग्यूचा कहर, रुग्णांची संख्या 1000 च्या पार

देशाची राजधानी दिल्लीत डेंग्यूचा धोका सातत्याने वाढत आहे. या वर्षी दिल्ली-एनसीआरमध्ये डेंग्यूची 1000 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. ज्यामध्ये गेल्या आठवडाभरात आणखी 280 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. गेल्या दोन आठवड्यांत राजधानीत डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 18 ऑक्टोबर रोजी दिल्लीत डेंग्यूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. नागरी अहवालानुसार, या हंगामात 23 ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूच्या 1006 रुग्णांची नोंद झाली आहे. जे वर्ष 2018 नंतर सर्वाधिक आहे.