Now Loading

कोरोनाव्हायरसच्या डेल्टा व्हेरिएन्टच्या प्रकरणांनी चीनमध्ये केला कहर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू

चीनच्या अनेक भागांमध्ये कोरोनाव्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. चीनच्या वायव्येकडील इनर मंगोलियाच्या एजिन काउंटीमधील लोकांना सोमवारपासून घरी राहण्यास आणि COVID-19 निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले गेले. सध्या, एजिन हे कोरोनाव्हायरस संसर्गाचे हॉटस्पॉट आहे कारण गेल्या आठवड्यात येथे 150 हून अधिक नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने चेतावणी दिली आहे की सुमारे एका आठवड्यात कोविड-19 संसर्ग 11 राज्यांमध्ये पसरला आहे आणि येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडू शकते.
 

अधिक माहितीसाठी: CNN | The Times Of India