Now Loading

उत्तर प्रदेश: मथुरेच्या रिक्षाचालकाला Income Tax विभागाने पाठवली साडेतीन कोटी रुपयांची नोटीस

उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. आयकर विभागाने एका रिक्षाचालकाला साडेतीन कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. नोटीसची माहिती मिळताच रिक्षाचालकाने थेट पोलिस ठाणे गाठले. जिथे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आणि सांगितले की, 2018 मध्ये त्यांनी पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज केला होता. त्याच्याकडे तेवढे उत्पन्नही नाही, जेवढी नोटीस आली आहे. ही बाब समोर आल्यानंतर आयकर विभागाच्या कारभाराबाबत शहरात विविध चर्चा सुरू आहेत.