Now Loading

हडपसर परिसरात बिबट्याचा माणसावरती हल्ला

आज दिनांक 26/10/2021 रोजी सकाळी 6 च्या सुमारास गोसावी वस्ती, गावदेवी मंदिर परिसर साडेसतरानळी हडपसर येथे संभाजी बबन आतोडे वय -45 वर्ष या इसमावर बिबट्या ने हल्ला केल्याची बातमी वनविभागास कळतास वनविभागाची संपूर्ण टीम तात्काळ घटना स्थळी पोहचली. सदर हल्ला झालेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असून, कुठलीही जीवित हानी झालेली नाही. सदर इसमावरती ससून सार्वजनिक रुग्णालय पुणे येथे त्यांचे वरती उपचार सुरु आहे. सदरच्या बिबट वन्यप्राण्यांच्या हालचालीवर पुणे वनविभागाकडून देखरेख सुरु आहे. तरीही नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. राहुल पाटील यांनी केले आहेत.