Now Loading

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून

पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सोमवार 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. शनिवार 13 नोव्हेंबर, रविवार 14 नोव्हेंबर, शनिवार 27 नोव्हेंबर आणि रविवार 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे आदींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.