Now Loading

चुकीच्या पद्धतीने गुळ उत्पादन करणाऱ्या गुऱ्हाळ चालकावर जप्तीची कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दौंड तालुक्यात चुकीच्या पद्धतीने गुळ उत्पादन करणाऱ्या पाच गुऱ्हाळ चालकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार प्रशासनाने मागील काही कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये काही गुळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गुळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतीत कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केल्यानंतरही बरेच चुकीचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्यावरून 22 ऑक्टोबर 2021 रोजी दौंड तालुक्यातील 5 गुऱ्हाळ चालकावर नमुने, जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 4 गुऱ्हाळ चालक हे विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे.