Now Loading

भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ

पुणे: भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जिल्ह्यात 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली. या वर्षीचा सप्ताह ‘स्वतंत्र भारत @७५: सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे' या संकल्पनेसह साजरा करण्यात येत आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुहास नाडगौडा, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक श्रीहरी पाटील आदि उपस्थित होते.