Now Loading

लखीमपूर खेरी मधील हिंसाचार केसच्या साक्षीदारांना संरक्षण देण्याचे निर्देश SC ने यूपी सरकारला दिले

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, यूपी सरकारचे वकील हरीश साळवे यांनी न्यायालयाला सांगितले की न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत आणि त्यापैकी 23 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. सुप्रीम कोर्टाने यूपी सरकारला घटनेच्या साक्षीदारांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिले. आता या खटल्याची सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या हिंसक घटनेत चार शेतकरी आणि एका पत्रकारासह आठ जणांचा मृत्यू झाला होता. 

अधिक माहितीसाठी - Hindustan Times |  NDTV