Now Loading

टायगर श्रॉफच्या गणपत चित्रपटात अमिताभ बच्चनची एन्ट्री, बॉक्सर वडिलांची भूमिका साकारणार

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांचा आगामी चित्रपट गणपत पार्ट 1 मध्ये इंडस्ट्रीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात बिग बी टायगरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर टायगरचे वडील जॅकी श्रॉफ देखील गणपतमध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गणपतच्या निर्मात्यांनी बिग बींशी संपर्क साधला आहे. या चित्रपटात टायगर बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभही बॉक्सर वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकर्स आणि बिग बी यांच्यात तारखांबाबत चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण यूकेमध्ये होणार आहे. टायगर आणि क्रिती लंडनला पोहोचले आहेत. दुसरीकडे, अमिताभ यांनी चित्रपटाला होकार दिल्यास टायगर आणि अमिताभ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
 

अधिक माहितीसाठी :- ABP Zee News