Now Loading

दोन दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली.

सरकारी तेल कंपन्यांनी आज इंधन दराचे नवे दर जारी केले आहेत. सलग दोन दिवस स्थिर दरानंतर आज इंधनाचे दर वाढले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35-35 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल 107.94 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल-डिझेल 113.80 ते 104.75 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. चेन्नई-कोलकाता येथे पेट्रोल 104.83-108.45 रुपये आणि डिझेल 100.92-99.78 रुपयांना विकले जात आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.
 

अधिक माहितीसाठी:-  Zee Business