Now Loading

तामिळनाडू : कल्लाकुरिची येथे फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यातील शंकरपुरम शहरात काल रात्री फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. या आगीत सुमारे 10 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही विशेष माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर दुकानात फटाक्यांचा भरपूर साठा होता. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आणि आपत्कालीन वॉर्डात उपचार घेत असलेल्या जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
 

अधिक माहितीसाठी: The New Indian Express | Hindustan Times