Now Loading

पाथरीत इंदुरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न

पाथरी येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन पार पडले. या कीर्तनास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पाथरीत २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. चौधरी मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा होत आहे. यात २७ ऑक्टोबर रोजी सकाळी होम हवन सोहळा पार पडला. आज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत रामराव महाराज ५ यांचे कीर्तन, २८ ऑक्टोबर रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पूर्णाहूती व दुपारी १२ ते २ स्वामी मनीषानंद पुरी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.