Now Loading

क्रूझ ड्रग्ज प्रकरणा मध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात आर्यन खानचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध असल्याचे सांगून त्याच्या जामिनाला विरोध केला आहे. एनसीबीने असा युक्तिवाद केला की आर्यनला जामीन दिल्याने या प्रकरणातील तपास अडचणीत येऊ शकतो. एजन्सीने असेही म्हटले आहे की आर्यन एक प्रभावशाली व्यक्ती आहे आणि जामिनावर सोडल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते.