Now Loading

माखणीच्या 'एकलव्य' अभ्याशिकेस हवाय 'प्रकाश' दाता

गंगाखेड, माखनी येथील एकलव्य अभ्याशिकेत गावातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यास करतात. लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून या अभ्याशीकेस दानशूर व्यक्तींनी इन्वर्टर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दानशूरांनी ही मागणी पूर्ण करावी असे आवाहन परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले. बुधवारी कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर व त्यांचे सहकारी माजी सरपंच जयदेव मिसे भागवतकार ह भ प शिवाजी महाराज बोबडे आदींनी माखणी येथे भेट दिली. एकलव्य अभ्यासिकेचे संकल्पक नंदकुमार सिसोदिया यांच्या विनंतीवरून सखाराम बोबडे पडेगावकर व सहकाऱ्यांनी एकलव्य स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रास भेट दिली. व तेथील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. उपस्थित विद्यार्थ्यांनी ही अभ्यासिका सुरू करण्यात काय काय मेहनत घेतली व आजपर्यंत अभ्यासकेतील किती विद्यार्थी नोकरीस लागले याची माहिती दिली .पण अलीकडील काळात लोड शेडींग होत असल्याने अभ्यास करण्यात खूप अडचणी येत आहेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आमच्यासाठी किमान उजेड पडेल एवढ्या छोट्या इन्वर्टर ची सोय करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था याकडे पाठपुरावा करून आपली ही मागणी पूर्ण केली जाईल असे आश्वासन सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिल. दानशूर व्यक्तींनी या अभ्यासकीचे संकल्पक नंदकुमार सिसोदिया यांच्याशी 9921188963 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून इन्व्हर्टर, स्पर्धा परीक्षांची जुनी पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याची मदत करावी असं आवाहन करण्यात आलंय. यावेळी सोहम सिसोदे, अक्षय शिसोदे, विजय पुरी, भागवत सिसोदे, किरण सिसोदे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.