Now Loading

केंद्र सरकारच्या सर्व मीडिया हाउस ला 'आझादी का अमृत महोत्सव'चा लोगो दाखवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत

केंद्र सरकारने आज सर्व मीडिया हाऊसेस म्हणजेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाला 'आझादी का अमृत महोत्सव'चा लोगो दाखविण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या ‘स्वातंत्र्य महोत्सव’ मोहिमेअंतर्गत हा लोगो दाखवण्यात यावा, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की देशभक्तीची भावना जागृत करण्यात आणि राष्ट्रीय कामगिरी सांगण्यासाठी खाजगी माध्यमे नेहमीच पुढे असतात. त्यामुळे देशवासियांना भारताच्या सुवर्ण इतिहासाची माहिती व्हावी आणि चांगल्या भविष्याचा संकल्प करता यावा यासाठी या लोगोचा वापर या उत्सवाच्या निमित्ताने करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.