Now Loading

राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत ऋतिका, बिल्वा यांना पदक

बंगळुरु येथील ६७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ऋतिका श्रीराम हिला सुवर्णपदक तर बिल्वा गिराम हिने रौप्यपदक पटकावले आहे. सोलापूरची कन्या व रेल्वे संघाकडून खेळत असलेली ऋतिका श्रीराम हिने एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात सुवर्णपदक मिळाले. सोलापूरच्या बिल्वा अनिल गिराम हिने द्वितीय क्रम कासह रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. तिने १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या प्रकारात ही कामगिरी बजाविली आहे. तिलाप्रशिक्षक श्रीकांत शेटे, मनीष भावसार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ऋतिका हीला रेल्वेचे उमेश प्रसाद, भाऊसाहेब डिगे, ऋषीकेश गुल्लापल्ली, मनिष भावसार, हरी प्रसाद यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बिल्वा हिला प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.