Now Loading

हद्दवाढ भागातील त्या शाळांसाठी २ कोटींची तरतूद

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत यावर्षीही कोरोनासाठी राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे. तरीही जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील विकासाची नोंद घेऊन त्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेची हद्दवाढ झालेल्या भागातील जिल्हा परिषदेच्या ३६ शाळांच्या दुरुस्ती करीता पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे सांगून उर्वरित निधीही देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे सांगितले.