Now Loading

मोटारसायकलवरून पडून तरूणाचा मृत्यू

मार्केट याडांच्या गेटसम र मोटारसायकलस्वाराच्या हलगर्जीपणामुळे मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ओंकार भीमाशंकर पदमगोंडा (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा त्याचा मित्र राहूल श्रीशैल उपासे (वय ३०, उत्तर कसबा सोलापूर) याच्या (एम.एच. १३- डी.पी. ३४५९) या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून पाठीमागे बसून जात असताना मार्केट यार्डासमोर राहूल याने मोटरसायकल भरधाव वेगाने चालवल्याने पाठीमागे बसलेला ओंकार हा खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान ओंकार याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला मोटारसायकल चालक राहुल उपासे हाच जबाबदार असल्याची फिर्याद मृत ओंकारचे वडील भिमाशंकर पदमगोंडा यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे. त्यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.