Now Loading

मोबाईलसह २६ हजाराचा ऐवज लंपास

मार्केट यार्डातील दुकानातून अज्ञात दोघांनी मोबाईलसह २६ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवार दि. २७ ऑटोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. आनंद भारतभुषण आरसीद (वय ३३, घर नं. १३० पूर्व मंगळवार पेठ सोलापूर) यांचे मार्केट यार्डात आनंद ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान असून दुकान बंद असताना अज्ञात दोघांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील सॅमसंग आणि विवो कंपनीचा असे दोन मोबाईल तसेच रोख ५ हजार ३०० असा एकूण २६ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. त्यावरून जेलरोड पोलीस ठाण्यात आनंद आरसीद यांनी फिर्याद दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.