Now Loading

आर्यन खान ड्रग केस मधील एनसीबीचा एकमेव साक्षीदार किरण गोसावीला केला अटक

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा एकमेव साक्षीदार किरण गोसावी याला आज अटक करण्यात आली आहे. किरण गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पुष्टी पुणे पोलीस आयुक्तांनी केली असून फसवणुकीप्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत आहे. 2018 च्या फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट परिपत्रक जारी केल्यापासून गोसावी फरार होता. मात्र, क्रूझच्या छापेमारीनंतर आर्यन खानला एनसीबी कार्यालयात ताब्यात घेतल्यानंतर तो त्याच्यासोबत सेल्फी घेताना दिसला. गोसावीचा कथित ड्रायव्हर आणि बाऊन्सर प्रभाकर सैल यांनी दावा केला होता की, एनसीबीचे अधिकारी गोसावी आणि इतरांनी आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती.
 

अधिक माहितीसाठी -  NDTV | The Indian Express | The Times Of India