Now Loading

साखर कारखानदारी पुढे येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत सभासद, ऊस उत्पादक व कामगारांच्या बळावर ‘विश्वास’ कारखाना 6 लाख टनाचे गाळप करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. 

 : साखर कारखानदारी पुढे येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत सभासद, ऊस उत्पादक व कामगारांच्या बळावर ‘विश्वास’ कारखाना 6 लाख टनाचे गाळप करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.  चिखली (ता. शिराळा) येथील विश्वाससराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर प्रमुख उपस्थितीत होते.  आमदार नाईक म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वारणा, मोरणा, कडवी या प्रमुख नद्या येतात. त्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील ऊस क्षेत्रातील ऊस पाण्याखाली गेला होता. हे बाधीत क्षेत्र सुमारे 50 हजार टन ऊसाचे आहे. हा ऊस गाळपासाठी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी खास यंत्रणा कार्यान्वीत करणार आहे. याशिवाय तोडणी कार्यक्रम नोंदीप्रमाणे राबविण्यात येईल. शेतकऱ्यांनी पिकवलेले ऊस तोडणी झाल्यानंतर लवकरात लवकर गाळपासाठी कसा येईल, हे पाहिले जाईल. तरी ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अजूनही आपणा ऊस नोंदविलेला नाही, त्यांनी कारखान्याच्या गट कार्यालयाशी संपर्क साधून नोंदवावा, असे आवाहन आमदार नाईक यांनी यावेळी केले.  प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. संचालक हंबीरराव पाटील यांनी काटापूजन करुन गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून सन 2021-22 गळीत हंगामाचा शुभारंभ केला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, संचालक सवश्री. दिनकरराव पाटील, मानसिंग पाटील, बाबुराव नांगरे, विजयराव नलवडे, विष्णू पाटील, विश्वास कदम, सुरेश पाटील, बिरुदेव आमरे, यशवंत दळवी, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, तानाजी वनारे, दत्तात्रय राणे, बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील, शामराव मोहिते, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, विश्वास कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे आदी मान्यवर, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. सचिव सचिन पाटील यांनी आभार मानले. -----------------------------------