Now Loading

महानगरपालिका हद्दीतील चौक सुशोभिकरणात महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, निदान केंद्र, वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे नावाचे, होणाऱ्या उपचारांचे, योजनांच्या फलकानी सुशोभिकरण करून प्रसिद्धी द्या. वंचित बहुजन आघाडी ची मागणी...

महानगरपालिका हद्दीतील चौक सुशोभिकरणात महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, निदान केंद्र, वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे नावाचे, होणाऱ्या उपचारांचे, योजनांच्या फलकानी सुशोभिकरण करून प्रसिद्धी द्या. वंचित बहुजन आघाडी ची मागणी... सांगली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. महानगरपालिकेच्या वतीने १० प्राथमिक आरोग्य केंद्र, निदान केंद्र तसेच नुकतेच पायाभरणी केलेले महानगरपालिकेचे वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. या आरोग्य केंद्रात आपणाकडे तज्ञ डॉक्टर, अनुभवी नर्सेस, आशा वर्कर, इतर स्टाफ चांगल्या प्रकारे नागरिकांची मनोभावे सेवा करत आहेत. महानगरपालिकेच्या दवाखान्यात अल्प दरात किंबहुना मोफत मध्ये वैद्यकीय उपचार होत आहेत. दरवर्षी लाखो कोरोडो रुपये आपण नागरिकांच्या आरोग्यावर खर्च करत आहोत परंतु अजूनही हजारो नागरिकांना महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात होणाऱ्या उपचाराविषयी, योजना विषयी अनभिज्ञ आहेत परंतु महानगरपालिका महानगरपालिकेच्या उपचारांची, योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कमी पडत आहे असेच चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, निदान केंद्र, नुकतेच पायाभरणी झालेले वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांची जाहिरात करण्या ऐवजी महानगरपालिका प्रशासन खाजगी हॉस्पिटलची जाहिरात करण्यात मग्न आहे. जर खाजगी हॉस्पिटलची जाहिरात करायची असेल तर नागरिकांचे लाखो करोडो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र, निदान केंद्र, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारून उपयोग काय? महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम असताना इतर खाजगी हॉस्पिटलची जाहिरात करण्याची गरजच काय?  वंचित बहुजन आघाडी अशी मागणी करते की, महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी हॉस्पिटलला चौक सुशोभिकरण करण्यासाठी दिलेले काम काढून घ्यावे व सदर खाजगी हॉस्पिटल आस्थापनाची जाहिरात साधन सामुग्री काढण्यात यावी व महानगरपालिकेच्या वतीने चौक सुशोभिकरण करून सर्व चौकात महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणारी प्राथमिक आरोग्य केंद्र, निदान केंद्र, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये होणारे उपचार व योजना यांची माहिती असणारे महानगरपालिके मार्फत नागरिकांना विविध सार्वजनिक आरोग्य बाबतीत दिल्या जाणाऱ्या सुविधा याची माहिती फलक लावून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे महत्त्व वाढवावे. तरी मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व चौकात तसे नियोजन करण्यात  यावे अन्यथा दि. ३ नोव्हेंबर २०२१ पासून सांगली महानगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, अशोक लोंढे, श्रीकांत ढाले, किशोर आढाव,पवन वाघमारे, डॉ.रवींद्र विभुते, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.