Now Loading

महाविकास आघाडी सरकार ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविणार ; महसूलमंत्री थोरात

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविणार असून या योजने अंतर्गत राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे गुरुवारी दिली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले.