Now Loading

पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये तीन दिवसांचा लॉकडाऊन लागू केला, १९ कंटेनमेंट झोन घोषित

पश्चिम बंगालमध्ये,साऊथ 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूर भागात कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत केवळ आपत्कालीन सेवांनाच काम करण्याची परवानगी असेल. सोनारपूरमध्ये आतापर्यंत १९ कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने बंगाल सरकारला पत्र लिहून दुर्गापूजेपासून कोलकातामधील कोविड-19 प्रकरणांमध्ये सुमारे 25% वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.