Now Loading

दलित महासंघ इस्लामपूर यांच्या वतीने वाळवा नायब तहसीलदार यांना निवेदन  वृद्ध महिलेला न्याय द्या संस्थापक अध्यक्ष, प्रा.डॉ मछिंद्र सकटे  दलित महासंघ ही संघटना फुले. शाहू.आंबेडकर, यांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना असून गोरगरीब जनतेसाठी 30 वर्षा पासून मा. प्रा. डॉ.मच्छिन्द्र सकटे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, या राज्यात कार्यरत असून दलित महासंघटनेच्या माध्यमातून समाज्यातील विविध प्रश्नावर आक्रमक पने आंदोलन करणारी एकमेव संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम चालू आहे...  श्रीमती बाळाबाई रामचंद्र खराडे वय 78 राहणार भैरववाडी  तालुका -शिराळा  जिल्हा -सांगली यांची वडिलार्जित जमीन नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे असून त्यांचा गट नंबर 405 /6 असा आहे.. श्रीमती बाळाबाई रामचंद्र यांचे भाऊ वसंत बापू खुडे व सर्जेराव बापू खुडे  शांताराम अंतु चव्हाण यांनी श्रीमती बाळाबाई रामचंद्र खराडे यांची हिस्सेची  ची जमीन मयत  असल्याचे दाखवून खरेदी-विक्री व्यवहार संगनमताने केलेला आहे तसेच वकील  प्रीतम संभारे  राहणार इस्लामपूर यांची संबंधित महिला श्रीमती बाळाबाई  रामचंद्र खराडे  या मयत असल्याचा शोध अहवाल दिला आहे त्यामुळे सदरची खरेदी विक्री व्यवहार झालेला आहे त्यामुळे श्रीमती बाळाबाई रामचंद्र खराडे यांची संबंधित इसमाकडून घोर फसवणूक होऊन त्यांच्यावर ती अन्याय झालेला आहे याबाबत श्रीमती बाळाबाई रामचंद्र खराडे यांनी कासेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 15- 10 -2021  लेखी तक्रारी अर्ज दिलेला आहे परंतु कासेगाव पोलीस स्टेशन कडून संबंधित इसमावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे म्हणून श्रीमती बाळाबाई रामचंद्र खराडे यांनी आमचे दलित महासंघाकडे लेखी तक्रार दिलेली आहे तरी आपणास या निवेदनाद्वारे असे कळविण्यात येते की श्रीमती बाळाबाई रामचंद्र खराडे यांच्यावर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी होऊन संबंधित इसमावर सात दिवसाचे आत कारवाई करावी अन्यथा आमचे संघटनेला रस्त्यावरती उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.. मा, विकास बल्लाळ  सांगली जिल्हा अध्यक्ष  ज्योती अवघडे  सांगली जिल्हा उपाध्यक्षा  मा, तानाजी देवकुळे  सांगली जिल्हा उपाध्यक्ष  मा, संतोष चांदणे  वाळवा तालुका अध्यक्ष  मा, अधिक देवकुळे  विभागीय अध्यक्ष वाळवा शिराळा तालुका  मा, बापूराव बडेकर वाळवा तालुका कार्याध्यक्ष  मा, रवि बल्लाळ  वाळवा तालुका संघटक  मा, दीपक मिसाळ  वाळवा तालुका उपाध्यक्ष  मा, अजिंक्य बल्लाळ  वाळवा तालुका खजिनदार