Now Loading

डॉ.डी.वाय. पाटील यांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन बिहारचे माजी राज्यपाल कथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ डी. वाय.पाटील यांनी गुरुवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी शेगावात पोहोचून श्री. संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. तत्पूर्वी स्वर्गीय कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. डॉ. डी. वाय.पाटील यांचे संतनगरी शेगावशी अतूट नाते आहे स्वर्गीय कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील आणि डी वाय पाटील या दोघांच्या परिवाराचे एकमेकांशी पारिवारिक संबंध आहेत. यामुळे डॉक्टर डी वाय पाटील हे नेहमीच शेगावात स्वर्गीय भाऊंच्या कडे येत होते. दरम्यान स्वर्गीय कर्मयोगी भाऊंचे स्वर्गवास झाल्यानंतर डी वाय पाटील हे शेगांव शहरात प्रथमत पोहोचले आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टर ने बाळापुर रोडवरील हेलिपॅडवर पाटील यांचे संस्थानच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा भाऊंचे निवासस्थानी पोहोचला तेथे त्या भाऊंच्या परिवारांचे त्यांनी सात्वन केले यानंतर श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन हेलिकॉप्टरने परत निघाले.