Now Loading

मोदी सरकारने शेतकरी हितासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

देशामध्ये उद्योजक, शासकीय कर्मचारी व इतर सर्व क्षेत्रातील लोकांना विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासनाच्यावतीने मागील काळात मदत मिळाली. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावलेले आहे. परंतु देशाचा पोशिंदा शेतकरी हा त्याचा व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर, धान्याचे दर आतापर्यंत व्यापार्‍यांच्या ईच्छेवर व जागतिक परिस्थितीवर अवलंबून होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या देशात मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षापासून शेतकर्‍याला न्याय, आधार देण्याचा प्रयत्न कोरोनासारख्या विविध संकटावर मात करून काढत आहेत. गेल्या सात वर्षात मोदी सरकारने डॉ.स्वामीनाथन रिपोर्ट स्वीकारून शेती मालाला एम.एस.पी. दिली, क्रांतीकारी शेतकर्‍यांच्या हितांचे कृषी कायदे आणले, साखरेची एम.एस.पी.दिली, पी.एम.किसान सन्मान योजनेतून सहा हजार रूपये, लहान शेतकर्‍यांसाठी पेंन्शन योजनेतून तीन हजार रूपये दरमहा देण्याची घोषणा, धान्याच्या खरेदीचे भाव वाढविले, बियांचे नवीन संशोधन ज्यातून शेती उत्पादनात वाढ, शेती प्रक्रिया उद्योग व पूरक व्यवसायात मोठी आर्थिक तरतूदीची व्यवस्था केली. या सर्व बाबीमुळे शेतकर्‍याला निश्‍चितच दिलासा मिळणार आहे. आणखीनही काही निर्णय शेतकर्‍यांसाठी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चाचे गोवा प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली. यावेळी ते गोवा प्रदेश किसान मोर्चाच्या पदाधिकार्‍यांसमवेत पणजी येथील भाजपा पक्ष कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, गोवा किसान मोर्चाचे अध्यक्ष वसूदेव गोवेकर, प्रदेश सरचिटणीस उदय प्रभू देसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी भाजपा किसान मोर्चाचे गोवा प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा शाल व पुष्पगूच्छ देवून सत्कार केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.   गोव्यामध्ये पून्हा भाजपा सत्तेत येईल गोवा हे जगातील प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. पोर्तुगिजांनी 451 वर्ष गोव्यावर राज्य केले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर चौदा वर्षांनी उशीरा गोव्याला स्वातंत्र्य मिळाले व 30 मे 1987 साली पूर्ण राज्याचा दर्जा गोव्याला मिळालेला आहे. या राज्याचा विकास करण्याचे काम गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै.मनोहरजी पर्रीकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले आहे. त्यांच्यानंतर श्रीपादजी नाईक केंद्रिय मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री ना.प्रमोद सावंत साहेब करीत आहेत. त्यामुळे येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत पून्हा भाजपा पक्ष सत्तेत येईल. असा विश्‍वास किसान मोर्च्याचे गोवा प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तालवडे, किसान मोर्चाचे अध्यक्ष वसूदेव गोवेकर व प्रदेश सरचिटणीस प्रभूदासजी यांनीही मनोगत व्यक्‍त केले.