Now Loading

महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्थांना दिलेला शबद पाळला

लातुर:(शुक्रवार दि. २९ आँक्टोबर २१) राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्थांना दिलेला शब्द पाळला आहे. सर्व अपद्ग्रस्थांना आधार देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली असून यात पहिल्या टप्यातील मदतीचा निधी जिल्हा प्रशासन व तहसिल कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा व बॅक प्रशासनाने दोन दिवस परिश्रम घेऊन शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचवावी व  त्यांची दिवाळी गोड करावी असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. या संदर्भाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ या दोन महिन्यात मराठवाडा, विदर्भ आणि राज्याच्या अन्य भागात अतिवृष्टी झाली. यातून काही ठिकाणी पूर परिस्थितीही निर्माण झाली. परिणामी शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे, जमिनीचे आणि स्थावर मालमेत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री व मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी आपदग्रस्त भागात जाऊन् शेतकरी  व जनतेला धीर दिला होता, त्यांना या संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले होते. दिलेला हा शब्द पाळत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अपदग्रस्तांसाठी १० हजार कोटीची मदत जाहिर केलीआहे. या मदतीचा पहिला टप्पा दिवाळी पुर्वी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या प्रमाणे जिल्हा व तहसिल प्रशासनाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. पहिल्या टप्पयात लातूर जिल्हयासाठी ३३६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे तो निधी तहसिल कार्यालया मार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात जिल्हा प्रशासनाने परिश्रम घेऊन हा निधी संबंधिताच्या खात्यावर वर्ग होईल यांची दक्षता घ्यावी. बॅक प्रशानानेही शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी पैसे मिळावेत यादृष्टीने व्यवस्था करावी असे आवाहन पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.