Now Loading

कन्हेरी लिंगायत स्मशानभूमी विस्थापितांच्या ताब्यात द्या- शिवा संघटना

लातूर: कन्हेरी येथील लिंगायत स्मशानभूमी अनेक आंदोलने करून मिळवली परंतु ती विस्थापितांच्या ताब्यात नाही ती विस्थापितांच्या ताब्यात द्या शिवा संघटनेची आयुक्तांना साकडे. कन्हेरी येथील लिंगायत स्मशानभूमी प्रस्थापितांच्या ताब्यात आहे केवळ तुम्ही लातूरचे रहिवासी नाहीत म्हणून शेकडो हजारो वेळा अपमानास्पद वागणूक देऊन दुजाभाव दाखवत प्रेत दफन विधी साठी प्रखर विरोध करत आले आहेत मात्र स्मशान भूमी येथील लिंगायत समाजाची असताना व विस्थापित समाज बांधवांनी अनेक आंदोलने केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अनेक गुन्हे दाखल झाले, कोर्टकचेरी झाली, आमने सामने झाले, एवढेच नाही तर जेल झाली यातूनच लिंगायत स्मशानभूमी मिळवली परंतु प्रस्थापित समाज मात्र तुम्ही लातूरचे रहिवासी नाहीत, विस्थापित व उपरे आहात या कारणावरून प्रेताची अनेक वेळा हेळसांड केली जात आलेली आहे त्यामुळे कन्हेरी लिंगायत स्मशानभूमी विस्थापितांच्या व सर्व समाज बांधवांच्या ताब्यात द्यावी असे निवेदन शिवा लिंगायत युवा संघटने तर्फे आयुक्तांना देण्यात आले यावर लवकरात लवकर तिन्ही स्मशानभूमी वर समाजाची एक समीती नेमणार असुन या स्मशानभूमी आपल्या ताब्यात दिले जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले तसेच ग्रेन मार्केट परिसरातील महात्मा बसवेश्वर यांच्या अनुभव मंटप मंदीरा बाजुला गुत्तेदार सुनिल पाटील यांनी केलेले अतिक्रमण काढुन ती जागा संपूर्ण अनुभव मंटप साठी देण्याचे मान्य केले व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. दयानंद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विस वर्षांपासून यासाठी पाठपुरावा केला अनेक आंदोलने, अनेक उपोषण, अनेक रास्ता रोको अनेको निवेदने हे त्याचे फलित आहे, या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील .चंद्रशेखर नारायण देसाई, श्रीमती मनीषाताई बोळशेटटे, बिराजदार विलास वीरशेट्टी, त्र्यंबक स्वामी,. शिवराज एकलिंगे, सतीश बस्वनप्पा फताडे, .शिवलिंग करेप्पा संगशेट्टी, संजय शिवशरण शिवशंकरआप्पा चितकोटे, शेटकार शिवराज मलप्पा, प्रभू आप्पा मुनाळे, गुरुनाथ स्वामी, राजकुमार दत्तात्रय नाईकवाडे, गणेश प्रकाश हेरकर,ॲड. अजय कलशेट्टी, महादेवी राजेंद्र, श्रीमती सुषमा खंडावकर सौ आशाताई बाळू स्वामी, श्रीमती पार्वती विरभद्र स्वामी,सौ.शारदा नागनाथ शिवनगे, श्रीमती कल्पना स्वामी, श्रीमती प्रभावती स्वामी, श्रीमती सुनिता स्वामी, श्रीमती शांता स्वामी,एस एस पानगावे, श्री कुमार स्वामी गणाचार्य, दिपक स्वामी, सुनिल भिमपुरे, प्राचार्य डॉ सी टी बिराजदार, प्रा.संतोष तोडकर,सौ.लताताई मुद्दे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.