Now Loading

जळकोट येथे आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पथनाटयातून जनजागृती

सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार  आझादी का अमृत महोत्सवानिमित्त  अखिल भारतीय कायदे विषयक जनजागृती अभियानांतर्गत उदगीर व जळकोट तालुका विधी सेवा समिती व मातृभूमी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर मातृभूमी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पथनाट्य  सादर करत जनजागृती केली. या पथनाट्याच्या शोचा शुभारंभ जळकोट येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात न्यायधिश बि. व्ही. दिवाकर, मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पोलीस निरिक्षक कदम, मातृभूमीचे अध्यक्ष सतिश उस्तुरे, अॅड. श्यामसुंदर गवळे, अॅड. हणमंत बलांडे, अॅड. तात्या पाटील, माधव टोंपे उपस्थित होते. मातृभूमीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून स्ञीभृण हत्या, स्ञी- पुरुष समानता, लेक शिकवा, लेक जगवा या विषयावर    पथनाट्य सादर केले. पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले तर ममता जाधव, कावेरी श्रीमंगले, संध्या सुर्यवंशी, उर्मिला राजगुरु, रिंकूराणी कांबळे, रोहीणी काटेकर, अनुराधा कोटंबे, करुणा कांबळे यांनी पथनाटय सादर केले. तसेच धम्मजित तिगोटे व देवरुप कांबळे यांनी  संगीत साथ दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी विधी सेवा समिती जळकोट, पोलीस स्टेशन जळकोट, नगर पंचायत जळकोटच्या कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन अॅड. महेश मळगे यांनी केले तर आभार अॅ ड. राजकुमार नावंदर यांनी मानले.