Now Loading

बजरंग जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने औसा व निलंगा मतदार संघातील राजकीय समीकरण बदलणार- शिवाजी माने

कासार सिरसी: येथील जिल्हा परिषद सदस्य व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांचे कट्टर समर्थक बजरंग जाधव यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेस नवीन उभारी मिळाली असून त्यांच्या या प्रवेशाने निलंगा व औसा मतदार संघातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे भाकीत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी कासार सिरशी येथील जाहीर सभेत केले याप्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बजरंग जाधव यांचा कासार सिरशी शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. औसा मतदार संघात समावेश असलेल्या चार महसूली विभागातील 68 गावात बजरंग जाधव यांचा  सत्कार करण्यात आला या समारंभाची सांगता कासार सिरशी येथे करण्यात आली असून बजरंग जाधव यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून मोठी झुंज दिली होती त्यांचा आता शिवसेनेत ्रवेश म्हणजे येणार्‍या विधानसभेची नांदीच असून जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश करत आगामी निवडणुकीसाठी या मतदार संघात शिट्टी वाजवली असल्याचे बोलले जात आहे. आपल्या भाषणात जिल्हा शिवसेना प्रमुख माने म्हणाले की धनुष्यबाण हे शस्त्र कोण्या सामान्य माणसाच्या हाती नसते, यासाठी सैनिकी वृत्ती अंगी असावी लागते , ही वृत्ती बजरंग जाधव यांच्यात आहे असे सांगून ते म्हणाले की, मी लातूर जिल्ह्यात भगवा फडकवणारच यासोबत निलंगा व त्यातून दोन आमदार मातोश्रीवर येणार असल्याचा संकल्प केला. पुढे म्हणाले की मी सैन्यदलात सैनिक होतो तोच बाणा ठेवून मी आता शिवसैनिक म्हणून काम करत असून मतदारांनी शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले.यावेळी सत्कार मूर्ती बजरंग जाधव म्हणाले की मी पक्ष बदलला मी बदललो नाही .केवळ नात्यागोत्या च्या कपटी राजकारणा कंटाळून मी शिवसेनेत आलो. याप्रसंगी शिवसेनेचे संजय मोरे,बालाजी रेड्डी, विनोद आर्य, सतीश शिंदे, अविनाश रेशमे, दिनेश  जावळे, प्रवीण कवाळे, सुनील नाईकवाडे, अविनाश पवार ,संजय मोरे, डॉक्टर कानडे, मयुर गबुरे व जगन जगदाळे यांची उपस्थिती होती.