Now Loading

कासार बालकुंदा येथे ग्रामसभा घेण्यात आली मात्र महिला ग्रामसभा झाली नाही; चौकशीची मागणी

कासार बालकुंदा: निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे ग्रामसभा संपन्न झाले. ग्रामसभेच्या पूर्वी निलंगा पंचायत समिती गट विकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी लसीकरणासाठी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. एका व्यक्तीने दहा व्यक्ती लसीकरण करण्याची जबाबदारी घेऊन 100% गाव लसीकरण करून घ्यावे असे मार्गदर्शन केले. ग्रामसभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पाणीप्रश्न, शौचालय, घरकुल, विरंगुळा कक्ष , दारूबंदी या विषयावर चर्चा करण्यात आली. ग्राम पंचायत निवडणूक होऊन आठ महिने झाले कोणतेही समिती गठन करण्यात आले नाही. परंतु ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिला ग्रामसभा होणे अनिवार्य असताना नियमाला बगल देत महिला ग्रामसभा घेतली नाही याबद्दल संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी अशी ग्रामस्थांतर्फे गट विकास अधिकारी यांना तक्रार दाखल केली आहेत. ग्रामसभेमध्ये विषय मांडत असताना गोंधळ निर्माण झाला. काही  विषयावर ती योग्य प्रकारे चर्चा करण्यात आली नाही. महिलांच्या हक्काचे ग्रामसभा न झाल्याने तसेच महिलाचे प्रश्न मांडण्यासाठीची ग्रामसभा न झाल्याने लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम येथील ग्रामपंचायतीतर्फे केले जात आहे. असा आरोप गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सदस्य रामधुलारी गोपाळे यांनी केली आहे.