Now Loading

भगवान बाबा महाविद्यालयात कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन

लोणार शहरातील भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालय लोणार येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये "मिशन युवा स्वास्थ्य" मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग, बायर क्रॉप सायन्स, नेहरू युवा केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. लोणार शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष वामनराव सांगळे, प्राचार्य डॉ. एस. जी. बडे, आरोग्य अधिकारी डॉ. कविता मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. एस. एच. गित्ते, बायर क्राॅप सायन्सचे श्री काटेकर, श्री सनेर, श्री शिंदे, श्री दौंड, नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक शितल मुंढे, ग्रामीण रुग्णालयाचे फार्मसिस्ट श्री खरात, सिस्टर वंदना घुगे व वैशाली पाडळे यांच्या समन्वयातून वय वर्षे 18 पूर्ण झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी व लोणार परिसरातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण राबविण्यात आले असल्याची माहिती ३० आक्टोबर रोजी देण्यात आली यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.