Now Loading

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) समन्सला आव्हान देणारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. नुकतेच सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील मालमत्तांवर छापे टाकले होते. देशमुख यांच्या जागेवर सीबीआयचा हा तिसरा छापा होता. तपास यंत्रणेने समन्स बजावल्यानंतरही देशमुख यांनी कार्यालयात हजर राहण्याचे सातत्याने टाळले आहे. देशमुख यांच्या घरावर छापा टाकल्याचे वृत्त समजताच त्यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी केंद्र सरकार आणि सीबीआयच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 

अधिक माहितीसाठी - The New Indian Express | Hindustan Times