Now Loading

पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली, भारतीय समुदायाच्या लोकांना सुद्धा भेटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला पोहोचले आहेत. आपल्या पाच दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. रोममधील पियाझा गांधी येथे जमलेल्या भारतीय समुदायातील लोकांशीही त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली.

अधिक माहितीसाठी:- News 18