Now Loading

उत्तर प्रदेश निवडणूक 2022: बसपाला मोठा झटका, 6 आमदार सपामध्ये झाले दाखल

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते पक्ष बदलत आहेत. दरम्यान, बहुजन समाज पक्षाला मोठा झटका बसला आहे. आज बसपाच्या 6 आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे सर्व आमदार बऱ्याच दिवसांपासून अखिलेशच्या संपर्कात होते. त्याचवेळी भाजपचे एक आमदारही सपामध्ये दाखल झाले आहेत.