Now Loading

चोरीच्या घटना वाढल्या, दुचाकी लंपास

खामगाव शहर व परिसरात चोरीच्या घटनां सतत सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र चोरांचा छडा लावण्यात पोलिस प्रशासनाला यश येत नसल्याचे दिसते. खामगाव शहरातील न्यायालय परिसरातून दुचाकी लंपास झाल्याची घटना ताजी असतांनाच शेगाव शहरातूनही चोरट्यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शेगाव शहरातील श्रीराम नगर भागात उघडकीस आली.याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीराम नगर मध्ये पाण्याचे टाकी जवळील रहिवाशी ज्ञानेश्वर गोपाळराव बाजारू यांनी 28 ऑक्टोबर चे रात्री त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 28 -ए एफ - ४७८७ ही घरासमोर उभी केली होती. दरम्यान रात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास केली. हे घटना ज्ञानेश्वर बाजारू यांना सकाळी निदर्शनास आले त्यांनी दुचाकीचा परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दुचाकी लंपास झाल्याची तक्रार दिले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेका वानखेडे हे करीत आहेत.